(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बाजारपेठेतील श्री दत्त मंदिरात गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गुरुवार दिनांक ४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता श्री दत्त जन्माचे कीर्तन, कीर्तनकार ह .भ. प.श्री. राजेंद्र बुवा मुळे चाफे. कीर्तनानंतर श्री दत्त पालखीसह रात्री दहा वाजता आरत्या व भोवत्या, शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत श्री लघुरुद्र सेवा, दुपारी 12:30 वाजता समाराधना (महाप्रसाद) रात्री दहा वाजता आरत्या व भोवत्या, रात्री अकरा वाजता ललिताच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता. अशाप्रकारे श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने येथील जयंती उत्सव समितीच्या वतीने नीटनेटके नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मंदिराची साफसफाई करून आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला मालगुंड परिसरातील भाविकांनी व स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कैलासवासी वसंत बापट यांच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.

