( नांदेड )
नांदेड जिल्ह्यातील सक्षम ताटे या तरुणाची हत्या धक्कादायक पद्धतीने झाली. पोलीस तपासानुसार, प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या वादातून सक्षमवर गोळी झाडून आणि डोक्यात फरशी घालून निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणाचे उघडकीस आलेले तपशील अत्यंत धक्कादायक आहेत.
घटनेचा सविस्तर तपशील प्रेयसी आंचल मामिडवार यांनी पोलिसांना दिला आहे. आंचलने सांगितले की, तिच्या प्रेमास तिचे वडील आणि भावांनी विरोध केला. त्यांनी दबावाखाली तिला धमक्या दिल्या आणि वर्षभर सक्षमविरोधात तक्रारी करण्यासाठी जबरदस्ती केली. तिच्या म्हणण्यानुसार, “गुन्हा दाखल केला नाही तर सक्षमला मारून टाकू किंवा स्वतः जीव देऊ” अशी धमकी देण्यात आली होती.
सक्षम ताटे आणि आंचल मामिडवार यांच्यातील प्रेमसंबंधाची माहिती आंचलच्या भावाला मिळाली होती. तिचा भावा हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. तो जेलमध्ये ही जावून आला आहे. आंचलने सांगितले की, माझ्या भावाने जरी सक्षम सोबत मैत्री केली असली तरी तो कधी तरी त्याचा बदला घेणार असं मला वाटत होतं. तो सक्षमला काही बोलायचा नाही. पण माझ्यासमोर बोलताना मी त्याला ठार मारणार असं वारंवार सांगायचा. सक्षमची हत्या झाली त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता. त्या दिवशी आपला भाऊ त्याच्यासोबत काही तरी करेल अशी भीती आपल्याला होती. त्यामुळे त्याला या शहरात राहू नको असं सांगितलं होतं, असंही तिने सांगितलं. सक्षमचा बर्थडे म्हटल्यावर माझा भाऊ तिथं जाणार. त्यामुले तो केकमधून काही तरी घालून त्याला मारतील असं मला वाटत होतं असं ही तिने बोलून दाखवलं.
आंचलने पुढे सांगितले की, “सक्षम आणि तिचे भाऊ चांगले मित्र होते. तर तीन वर्षांपूर्वी आमचे प्रेमसंबंध जुळले होते. वर्षभरापूर्वी माझ्या कुटुंबीयांना आमच्या प्रेमाची माहिती झाली, आणि त्यांनी खूप दबाव टाकला. पण सक्षम माझ्यावर खूप प्रेम करायचा. त्याला माझ्या बाबांबद्दल खूप आदर होता, आपण पळून जाऊ असे मी त्याला कायम सांगत असे, पण त्याने यासाठी कायम विरोध केला. आपण बाबांच्या संमतीनेच लग्न करू असे तो म्हणायचा”
आंचलच्या माहितीप्रमाणे, २७ तारखेला तिच्या भावाने पोलिस ठाण्यात तिला जबरदस्तीने सक्षमविरोधात तक्रार करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला, पण तिने तक्रार न दिली. तिच्या मते, काही पोलीस कर्मचाऱ्यांनी भावाला भडकवले आणि “रोज मारामाऱ्या करून इथे येतोस. तुझ्या बहिणीचं लफडं ज्याच्यासोबत आहे, त्याला मारून ये” असे सांगितले. त्यावर माझा लहान भाऊ पोलीसांना म्हणाला आज रात्री त्याला ठार मारतो आणि मगच तक्रार द्यायला स्वत: येतो असं सांगून तो तिथून निघून गेला असं आंचलने सांगितलं. त्यावेळी असं काही मोठं होईल याची मला काहीच कल्पना नव्हती. त्याचा विचार ही केला नाही. सक्षमची हत्या झाली आहे हे ही आपल्याला माहित नव्हतं. त्याची हत्या झाली त्याच वेळी घरचे म्हणाले चला आपण देवदर्शनाला जायचं आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मीही त्यांच्यासोबत देवदर्शनासाठी निघाल्याचं आंचलने सांगितलं.
सक्षमाच्या हत्येनंतर आंचलने धक्कादायक निर्णय घेत चक्क मृतदेहासोबतच लग्न केले, आणि सांगितले की, प्रियकराला मारून कुटुंब हरले, मात्र मी सक्षमच्या मृतदेहासोबत का असेना त्याच्याशी लग्न करून माझे प्रेम जिंकले आहे. सध्या नांदेड पोलीस या हत्याप्रकरणाचा तपास करत आहेत.

