( देवळे / प्रकाश चाळके )
रविवार, दि. 30 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रेट मराठा प्रतिष्ठान दापोलीतर्फे इस्माईल युसूफ कॉलेज, जोगेश्वरी (मुंबई) येथे ‘ग्रेट मराठा चषक : 25’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत दापोली आणि राजापूर तालुक्यातील एकूण 16 संघांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये दापोलीतील 13 संघ, तर राजापूरमधील 3 संघ सहभागी झाले.
या रोमांचक स्पर्धेत श्रीशा 11 करंजाणी संघाने प्रथम क्रमांक पटकावत ₹50,000/- (पन्नास हजार) रोख पारितोषिक मिळवले. कालकाई क्रिकेट संघ, वाकवली यांनी उत्कृष्ट खेळ करत द्वितीय क्रमांक पटकावला व त्यांना ₹25,000/- (पंचवीस हजार) रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी आकर्षक टी-शर्ट माजी सभापती दापोली, कै. श्रीपतराव (दादा) गणपतराव पवार यांच्या स्मरणार्थ श्री सुनील वसंतराव पवार यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच स्पर्धेतील सर्व पराभूत संघांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
स्पर्धेच्या भव्य बक्षीस वितरण समारंभास जोगेश्वरी पूर्वचे माननीय आमदार श्री. अनंत (बाळा) नर, दापोली-खेड-मंडणगड तालुक्यांच्या मराठा विद्याप्रचारक मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनील दळवी, जोगेश्वरी उपविभाग प्रमुख श्री. जयवंत लाड, मराठा समजणोत्ती संस्था मुंबईचे अध्यक्ष श्री. रणजित जाधव, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी, नियोजन आणि यशस्वी अंमलबजावणी ग्रेट मराठा प्रतिष्ठान दापोलीच्या टीमने पार पाडली. यात श्री. विलास जाधव, श्री. संजय पवार, श्री. गजानन गायकवाड, श्री. हेमंत पवार, श्री. संदेश कदम, श्री. विकास पवार व श्री. सुनील पवार यांचे विशेष योगदान उल्लेखनीय राहिले. आयोजकांनी सर्व विजेत्या आणि सहभागी संघांचे मनःपूर्वक आभार मानत स्पर्धेची सांगता करण्यात आली.

