( मुंबई )
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयांविरोधात जिल्हा न्यायालयात दाखल अपिलांवरील निकाल 23 नोव्हेंबर 2025 किंवा त्यानंतर आल्याने, 24 अध्यक्षपदे आणि एकूण 154 सदस्यपदांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या ठिकाणी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होईल. उर्वरित सर्व नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रांमध्ये निश्चित कार्यक्रमाप्रमाणे आज (2 डिसेंबर 2025) रोजी मतदान होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, काही ठिकाणी अध्यक्षपद व सदस्यपदांसंदर्भातील प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याने त्यांचा निकाल येईपर्यंत प्रक्रिया थांबविण्यात आली होती. आता हे निकाल आल्यानंतर अशा क्षेत्रांमध्ये सुधारित निवडणूक कार्यक्रम राबविला जाणार आहे.
अध्यक्षपदासंदर्भातील अपीलांचा निकाल उशिरा आलेल्या संस्थांमध्ये संपूर्ण क्षेत्रासाठी निवडणूक प्रक्रिया सुधारित कार्यक्रमानुसार होईल. कायद्यानुसार अध्यक्षपदासोबत सदस्यपदांची संयुक्त निवडणूक घेणे बंधनकारक आहे.
मात्र, फक्त सदस्यपदावरील अपील असलेल्या ठिकाणी सुधारित कार्यक्रम केवळ त्या जागांपुरता लागू असेल.
सुधारित निवडणूक कार्यक्रम
- नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिवस : 10 डिसेंबर 2025 (दुपारी 3 वाजेपर्यंत)
- उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हांचे वाटप : 11 डिसेंबर 2025
- मतदान : 20 डिसेंबर 2025 (सकाळी 7.30 ते सायं. 5.30)
- मतमोजणी : 21 डिसेंबर 2025 (सकाळी 10 वाजल्यापासून)
सुधारित कार्यक्रमानुसार अध्यक्षपद व सर्व सदस्यपदांसाठी निवडणूक होणाऱ्या 24 नगरपरिषद/नगरपंचायती
- ठाणे – अंबरनाथ
- अहिल्यानगर – कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा
- पुणे – बारामती, फुरसुंगी–उरुळी देवाची
- सोलापूर – अणगर, मंगळवेढा
- सातारा – महाबळेश्वर, फलटण
- छत्रपती संभाजीनगर – फुलंब्री
- नांदेड – मुखेड, धर्माबाद
- लातूर – निलंगा, रेणापूर
- हिंगोली – बसमत
- अमरावती – अंजनगाव सुर्जी
- अकोला – बाळापूर
- यवतमाळ – यवतमाळ
- वाशीम – वाशीम
- बुलढाणा – देऊळगावराजा
- वर्धा – देवळी
- चंद्रपूर – घुग्घूस
सुधारित कार्यक्रमानुसार निवडणूक होणाऱ्या 76 नगरपरिषद/नगरपंचायतीतील 154 सदस्यपदे :
- अमरावती – अचलपूर-2, दर्यापूर-1, धारणी-2, वरूड-1
- अहिल्यानगर – जामखेड-2, राहुरी-1, शिर्डी-1, शेवगाव-3, श्रीगोंदा-1, श्रीरामपूर-1, संगमनेर-3
- कोल्हापूर – गडहिंग्लज-1
- गडचिरोली – आरमोरी-1, गडचिरोली-3
- गोंदिया – गोंदिया-3, तिरोडा-1
- चंद्रपूर – गडचांदूर-1, बल्लारपूर-1, मूल-1, वरोरा-1
- छ. संभाजीनगर – गंगापूर-2, पैठण-4, वैजापूर-2
- जळगाव – अंमळनेर-1, पाचोरा-2, भुसावळ-3, यावल-1, वरणगाव-2, सावदा-3
- जालना – भोकरदन-2
- ठाणे – बदलापूर-6
- धाराशिव – उमरगा-3, धाराशिव-3
- नांदेड – कुंडलवाडी-1, भोकर-1, लोहा-1
- नागपूर – कामठी-3, कोंढाळी-2, नरखेड-3, रामटेक-1
- नाशिक – ओझर-2, चांदवड-1, सिन्नर-4
- परभणी – जिंतूर-1, पूर्णा-2
- पालघर – पालघर-1, वाडा-1
- पुणे – तळेगाव-6, दौंड-1, लोणावळा-2, सासवड-1
- बीड – अंबेजोगाई-4, किल्ले धारूर-1, परळी-5
- बुलढाणा – खामगाव-4, जळगाव जामोद-3, शेगाव-2
- भंडारा – भंडारा-2
- यवतमाळ – दिग्रस-3, पांढरकवडा-2, वणी-1
- रत्नागिरी – रत्नागिरी-2
- लातूर – उदगीर-3
- वर्धा – पुलगाव-2, वर्धा-2, हिंगणघाट-3
- वाशीम – रिसोड-2
- सांगली – शिराळा-1
- सातारा – कराड-1, मलकापूर-2
- सोलापूर – पंढरपूर-2, बार्शी-1, मैंदर्गी-1, मोहोळ-2, सांगोला-2
- हिंगोली – हिंगोली-2

