(राजापूर / तुषार पाचलकर)
पंचायत समिती-राजापूर आणि ग्रामपंचायत पाचल यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुका बांबू उत्पादक शेतकरी संघ (नियोजित) यांच्यावतीने राजापूर तालुक्यातील पूर्व भागातील सर्व बांबू उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य मेळावा २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता पाचल ग्रामपंचायत येथील कै. गो. बा. तथा आबा नारकर या सभागृहात घेण्यात येणार आहे. या मेळाव्याला बांबू फाउंडेशन-महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री पाटलोबो पाटील, राजापूर गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, प्रगतशील बांबू उत्पादक शेतकरी सौंदळ चे श्री वासुदेवराव घाग, राजापूर तालुका कृषी अधिकारी श्री अमोल सकपाळ उपस्थित राहणार आहे.
कोकणातील प्रत्येक शेतकऱ्याकडे बांबूची लागवड परंपरेने असून आता शेतकरी नव्याने बांबू लागवड व्यावसायिक पद्धतीने लावत आहे. त्यामध्ये काही स्थानिक जाती व काही नव्या जाती लावत आहेत. परंतु बांबूची विक्री प्रक्रिया व्यवस्थित नसल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे.
यावर उपाय शोधण्यासाठी समस्त शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन योग्य तो पर्याय शोधण्याची आवश्यकता आहे. हे सर्व समजून घेण्यासाठी, शेतकरी संघटित होण्यासाठी आपण शेतकरी मेळाव्याचे आयोजित करीत असून, प्रत्येक शेतकऱ्याने अगत्यपणे या मेळाव्यात येणे आवश्यक आहे. असं आवाहन राजापूर तालुका पूर्व भागातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी मोहनकाका नारकर, सुहास मोरे, वासुदेव घाग यांनी केले आहे.

