(खेड)
महाराष्ट्र शासनामार्फत टीईटी संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करणे, 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षण सेवक पद रद्द करणे, प्राथमिक शिक्षकांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे दहा-वीस तीस वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करणे इत्यादी मागण्यांसाठी दिनांक 05 डिसेंबर 2025 रोजी शाळा बंद आंदोलन तसेच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. तरी खेड तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांनी केले आहे.
शाळा बंद आंदोलनासंदर्भात तालुका स्कूल खेड येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडच्या सभेत बोलताना संतोष चव्हाण यांनी पुढे सांगितले की, कोणत्याही दबावाला बळी न पडता व अफवांवर विश्वास न ठेवता खंबीरपणे या शाळा बंद आंदोलन व महामोर्चात सर्व शिक्षकांनी सहभागी व्हावे व आंदोलन यशस्वी करावे.
या सभेला सचिव धर्मपाल तांबे, शिक्षक पतपेढी संचालक सुनील दळवी, ज्येष्ठ सल्लागार व पतपेढीचे माजी अध्यक्ष सुनील सावंत, कोषाध्यक्ष नवनीत घडशी, संघटना प्रवक्ता शैलेश पराडकर, दिलीप यादव, सल्लागार संजय गडाळे, एनपीएस प्रतिनिधी येडू केकान, सुनील वाघमारे, राजाराम दरेकर, उदय रेडीज आदी सभासद उपस्थित होते

