(खेड)
राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम यांच्या सौभाग्यवती श्रेया योगेश कदम यांनी नवरात्रोत्सवानिमित्त वरवली देऊळवाडी येथील श्री सोमजाई देवी मंदिराला भेट देत दर्शन घेतले. या प्रसंगी महिला जिल्हा प्रमुख सुप्रिया पवार, महिला तालुका अध्यक्षा मुग्धा भोसले, महिला आघाडी प्रमुख दर्शन मोरे, विभाग प्रमुख महिपत घोलप, महिला विभाग प्रमुख रेखा चव्हाण, वरवलीच्या सरपंच प्राजक्ता यादव, माजी सरपंच अनिता यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रेया कदम यांच्या आगमनावेळी शाखाप्रमुख दीपक यादव, बाळकृष्ण पवार, अनंत यादव, माजी उपसरपंच प्रदीप यादव यांनी सर्व मान्यवरांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी सरपंच प्राजक्ता यादव यांनी श्रेया कदम यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित केले. वरवली देऊळवाडीतील ग्रामस्थ बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

