(गणपतीपुळे / वैभव पवार)
लोकप्रिय विनोदी कलाकार आणि ‘हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे यांनी आज मालगुंड येथे विशेष सदिच्छा भेट दिली. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख तसेच तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या निवासस्थानी पत्नीसमवेत भेट देत स्नेहसंवाद साधला.
यानंतर दत्तू मोरे यांनी गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात भेट देत मनोभावे दर्शन घेतले आणि आपल्या पुढील कार्यासाठी आशीर्वादही मागितले. दर्शनानंतर त्यांनी गणपतीपुळे आणि मालगुंड परिसरातील निसर्गरम्य पर्यटन स्थळांचा आनंद घेत, समुद्रकिनाऱ्याची शांतता आणि नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेतला.
दत्तू मोरे यांच्या आगमनाने मालगुंडसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

