(रत्नागिरी)
बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित व बालरंग भूमी परिषद रत्नागिरी शाखा संयोजित जल्लोष लोककलेचा महोत्सव 2025 ही स्पर्धा खारवी समाज भवन श्री दामोदर लोकरे सभागृह, उद्यमनगर रत्नागिरी येथे संपन्न झाली. या स्पर्धेतील एकल नृत्य स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या आदर्श केंद्र शाळा रायपाटण नंबर १ची इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी दूर्वा मंगेश पराडकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. गतवर्षी चिपळूण येथे झालेल्या याच स्पर्धेमध्ये दूर्वा हिने प्रथम क्रमांक पटकावला होता
दूर्वा हिने सादर केलेल्या लावणी नृत्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. 17 वर्षाखालील या गटामध्ये इयत्ता पाचवीतील या छोट्या विद्यार्थिनीने सादर केलेले नृत्य अफलातून होते.
दुर्वा पराडकर हिने मिळवलेल्या या यशाबद्दल मुख्याध्यापक दिपाली धावडे, सुनील भांडेकर, अश्विनी माने, नीलम थरवळ, अध्यक्ष किशोर गुरव यांनी अभिनंदन केले. तिच्या या यशाबद्दल राजापूर परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

