( खेड )
शिक्षणातील गुणवत्ता संवर्धनासाठी आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी शैक्षणिक वर्ष 2025/26 पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र,पुणे यांच्या वतीने राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच डायटचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या स्पर्धातंर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुकास्तरावर फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन आय इ डी विभाग ,खेड येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत बिजघर नं.१ या शाळेतील शिक्षक श्री. शैलेश केशव पराडकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी फोटोग्राफी या स्पर्धेमध्ये भारतीय संस्कृती या विषयावर छायाचित्र सादर केले.
भारतीय संस्कृती जतन करण्यासाठी ती लहान मुलांमध्ये रुजवायला हवी. आपली भावी पिढी सुसंस्कारित व्हायला हवी. हा विषय छायाचित्रामध्ये मांडला होता. त्यांचे हे छायाचित्र परीक्षकांच्या पसंतीस उतरले व पराडकर यांना या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. लहानपणापासूनच फोटोग्राफीची कला जोपासणाऱ्या शैलेश पराडकर यांची जिल्हास्तरीय फोटोग्राफी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे

