( दापोली )
ए.जी. हायस्कूल, दापोली येथील माजी संस्कृत विषयाचे ज्येष्ठ शिक्षक सुभाष तांबे यांचे रविवारी (दि. २३ नोव्हेंबर २०२५) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ७८ वर्षे होते.
तांबे सरांनी अनेक वर्षे संस्कृत विषयाचे अध्यापन करत विद्यार्थ्यांवर संस्कारांची मुशाफिरी केली. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, स्नुषा आणि नातवंडे असा परिवार आहे.

