(दापोली)
जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी व तालुका क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोलीच्या ज्युनिअर कॉलेजच्या संघाने दापोली शहरातील वराडकर कॉलेजच्या संघावर मात करत दापोली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.
खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक अय्युब मुल्ला, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे मुख्याध्यापक अय्युब मुल्ला व क्रीडा शिक्षक प्रा.अशपाक खान यांचे मार्गदर्शन लाभले. मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार, सचिव इकबाल परकार, ज्युनिअर कॉलेज समितीचे अध्यक्ष आरिफ मेमन यांनी यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले व जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेस शुभेच्छा दिल्या आहेत.

