(दापोली)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि आंबा उत्पादक संघ केळशी यांच्या संयुक्त विद्यमाने केळशी येथे नारळ पिकावर माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या साठी विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी नारळ आणि आंब्यातील कीटक आणि रोगांच्या नियंत्रणावर व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष शरद परांजपे यांनी भूषवले.
नारळावर गेंड्या भुंगा, सोंड्या भुंगा, इरिओफाईड कोळी आणि उंदीर यांचा उपद्रव पूर्वी पिक्षा मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. यावरील उपाय-योजनांबाबत विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी लागवडीपासून ते काढणीपर्यंत माहिती दिली. यावेळी त्यांनी बागा स्वच्छ ठेऊन एकात्मिक कीड नियंत्रण कार्यक्रम राबवण्याचे आवाहन केले.
यावेळी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. बापूसाहेब शिंदे, डॉ. परेश पोटफोडे, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. अंबरीश सणस, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण झगडे यांच्यासह नारळ बागायतदार तसेच केळशी येथील इंद्रधनू व वसुधा गटाच्या कृषी कन्या उपस्थित होत्या.

