(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील सावरकर नाट्यगृह मारुती मंदिर रत्नागिरी येथे रविवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता “थिबा राजा कालीन बुद्ध विहार संबोधन जाहीर विराट सभा” आयोजित करण्यात आली असून या सभेला ट्रस्टचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची तोफ धडकणार असून तमाम बौद्ध समाजाने या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सर्व पदाधिकारी यांनी गावागावात जाऊन केले आहे.
रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती व बौद्ध महासभा सन २००९ पासून या बुद्ध विहार या ऐतिहासिक भूमीवर दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, धम्म प्रवर्तन दिन, थिबा राजा शतकोत्तर जयंती उत्सव असे विविध कार्यक्रम आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक आणून साजरे केले जातात. या ऐतिहासिक भूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नाम.रामदासजी आठवले यांनी अनेकदा भेटी दिल्या आहेत. तर मुंबई बौद्धजन पंचायत समितीचे सभापती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी १३ मे रोजी यांनी ही भेट देऊन तेथील संपूर्ण परिसराची पाहणी केली आहे. येथे नव्याने बुद्ध विहार होत आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या विराट सभेला मार्गदर्शन करण्यासाठी ट्रस्टचे वतीने अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार, एम.बी.कांबळे, विजय जाधव, सुनील कांबळे, यांचेसह रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.उदयजी सामंत उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री नाम.उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकारी, ट्रस्टचे पदाधिकारी, समाजातील पदाधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत बुद्धविहारासाठी ७.५० कोटी निधी उपलब्ध करून देण्याचे घोषित केले.

