सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यातील सर्व शिक्षकांना आता शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test – TET) उत्तीर्ण करणे बंधनकारक झाले आहे. या निर्णयानंतर यंदा टीईटी परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. विशेषतः पुणे, नाशिक आणि नांदेड या विभागांतून सर्वाधिक नोंदणी झाली आहे.
पुण्यातून 37,293, नाशिकमधून 32,031 तर नांदेडमधून 26,137 उमेदवारांनी यंदा टीईटीसाठी अर्ज केला आहे. राज्यातील एकूण 4,75,668 उमेदवारांनी परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली असून या परीक्षांसाठी 1,420 परीक्षा केंद्रे तयार करण्यात आली आहेत.
येणाऱ्या 23 नोव्हेंबर रोजी राज्यभरात टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 असे दोन वेगळे पेपर असून त्यासाठी उमेदवारांनी स्वतंत्र नोंदणी केली आहे.
-
पेपर 1 साठी – 2,03,333 उमेदवार
-
पेपर 2 साठी – 2,72,335 उमेदवार
पेपर 1 साठी 569 परीक्षा केंद्रे तर पेपर 2 साठी 851 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
विषयानुसार उमेदवारांची संख्या :
-
गणित (पेपर 1) – 1,01,794
-
सामाजिक शास्त्र (पेपर 2) – 1,70,541
जिल्हानिहाय नोंदणी (आकडेवारी)
-
मुंबई साउथ – 3,507
-
मुंबई वेस्ट – 4,981
-
मुंबई नॉर्थ – 4,162
-
रायगड – 5,974
-
ठाणे – 16,914
-
पालघर – 9,624
-
पुणे – 37,293
-
अहमदनगर – 22,850
-
सोलापूर – 21,305
-
नाशिक – 32,031
-
धुळे – 15,479
-
जळगाव – 13,200
-
नंदुरबार – 10,258
-
कोल्हापूर – 19,839
-
सातारा – 11,971
-
सांगली – 12,243
-
रत्नागिरी – 4,351
-
सिंधुदुर्ग – 2,423
-
छत्रपती संभाजीनगर – 24,200
-
जालना – 8,275
-
बीड – 13,991
-
परभणी – 11,057
-
हिंगोली – 5,308
-
अमरावती – 15,154
-
बुलढाणा – 11,283
-
अकोला – 9,794
-
वाशिम – 8,240
-
यवतमाळ – 10,373
-
नागपूर – 16,491
-
भंडारा – 8,776
-
गोंदिया – 8,415
-
वर्धा – 3,777
-
चंद्रपूर – 9,284
-
गडचिरोली – 7,038
-
लातूर – 21,744
-
धाराशिव – 7,926
-
नांदेड – 26,137

