(रत्नागिरी)
आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपले पुरस्कृत उमेदवार देऊन प्रवेश केला आहे. प्रभाग क्रमांक ५ मधून ऍडव्होकेट अभिलाष अतुल पिलणकर, प्रभाग क्रमांक ४ मधून इम्रान हुसैन नेवरेकर, प्रभाग क्रमांक ८ मधून सोमनाथ प्रदीप पिलणकर आणि प्रभाग क्रमांक ११ मधून तुषार कांबळे यांच्या नामनिर्देशनपत्रांना वैधता मिळाल्याने निवडणूक रंगतदार झाली आहे.
उच्चशिक्षित, तरुण आणि तडफदार अशी ओळख असलेल्या या उमेदवारांमुळे प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांसमोर जोरदार आव्हान निर्माण झाले आहे. स्थानिक स्तरावर या उमेदवारांची वेगळी छाप आणि कार्यशीलतेची प्रतिमा असल्याने त्यांच्याकडे मतदारांचेही विशेष लक्ष वेधले जात आहे.
दरम्यान, राज्य पातळीवर मनसे–शिवसेना (उबाठा) युतीच्या चर्चांना वेग आला असला, तरी रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना (उबाठा) कडून कोणताही अधिकृत युती प्रस्ताव मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे मनसेने स्वतंत्रपणे, पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरून आपल्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

