(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील पावस-तांबळवाडी येथे राहणाऱ्या एका वृद्धाने राहत्या भाड्याच्या चाळीत लोखंडी बारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. १८) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव भिकाजी रंगराव रसाळ (वय ६०, रा. तोडणकर यांची चाळ, पावस-तांबळवाडी) असे आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिकाजी रसाळ यांनी अज्ञात कारणातून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी घरातील दोन्ही दरवाजांना आतून कडी लावून, छतावरील लोखंडी बारास नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला.
घटनेची नोंद पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

