(रत्नागिरी)
माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी जयंती आणि राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ आज घेण्यात आली. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उपस्थितांना शपथ दिली. ‘मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो / घेते की, देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी मी निष्ठापूर्वक काम करीन.
मी अशीही प्रतिज्ञा करतो/करते की, मी कधीही हिंसाचाराचा अवलंब करणार नाही. तसेच, मी सर्व धार्मिक भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गाऱ्हाणे शांततामय आणि संविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवीन.’
यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, प्रादेशिक मनोरुग्णालय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले यांच्यासह अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

