( मुंबई )
राज्य सरकारची लोकप्रिय ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ई-KYC प्रक्रियेची अंतिम मुदत उद्या, 18 नोव्हेंबरला संपत आहे. मात्र अद्यापही जवळपास 1 कोटी महिलांची ई-KYC प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर महिलांना दिलासा देण्यासाठी सरकार लवकरच मुदतवाढ जाहीर करू शकते, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने महिलांची नाराजी टाळण्यासाठी ही मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता अधिक आहे.
योजनेतील महत्त्वाचे बदल
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांना लाभ बंद होणार आहे.
- आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
- पती किंवा वडील हयात नसलेल्या महिलांसाठी KYC प्रक्रियेत सवलत/बदल करण्यात येणार आहेत.
या योजनेत सुरुवातीला 2 कोटी 9 लाख महिलांनी अर्ज केले, त्यापैकी निकष न पाळणाऱ्या सुमारे 50 लाख अर्जांची छाननीत झाले आहेत.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्याने सरकार महिलांच्या नाराजीचा धोका पत्करण्याच्या भूमिकेत नाही. त्यामुळे निवडणुका पार पडेपर्यंत ई-KYCची मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे योजनेतील लाखो महिलांना दिलासा मिळू शकतो.
घरबसल्या ई-KYC करण्याची सोपी प्रक्रिया
मोबाईलवरून ई-KYC करणे अत्यंत सोपे आहे.
1. अधिकृत वेबसाइट ladakibahin.maharashtra.gov.in किंवा संबंधित ॲप उघडा.
2. ‘ई-KYC’ पर्याय निवडा.
3. तुमचा आधार क्रमांक टाका.
4. मोबाईलवर आलेला OTP भरून पडताळणी पूर्ण करा.

