(रत्नागिरी)
रत्नागिरी नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतची शहरातील उत्कंठा अखेर संपली आहे. बहुप्रतिक्षित असलेल्या महायुतीच्या उमेदवाराचे नाव काल रात्री उशिरा जाहीर झाले असून, शिवसेना (शिंदे गट) तर्फे शिल्पा सुर्वे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून शिवानी माने या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महाराष्ट्राचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिल्पा सुर्वे आज सकाळी ११ वाजता नगराध्यक्षपदासाठी आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करतील. या वेळी महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
शिल्पा सुर्वे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यामुळे आता नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून शिल्पा सुर्वे आणि महाविकास आघाडीकडून शिवानी सावंत-माने यांच्यात थेट आणि चुरशीची लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.

