(खेड)
खेड आयडी विभागात आज आयोजित तालुकास्तरीय शासकीय कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धेत आंबवली व नांदिवली (दंडवाडी) येथील मुख्याध्यापकांनी तबला आणि हार्मोनियम वादनात प्रभावी कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
तबलावादन स्पर्धेत आंबवली शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक समिती शाखा रत्नागिरीचे कार्यकारिणी सदस्य श्रीकृष्ण खांडेकर यांनी अप्रतिम वादन सादर करून प्रेक्षकांसह परीक्षकांनाही अक्षरशः मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सुरेल आणि लयबद्ध तबलावादनाने त्यांना प्रथम क्रमांकाचा मान मिळवून दिला. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हार्मोनियम (पेटी) वादन स्पर्धेत नांदिवली दंडवाडी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक समिती शाखा खेडचे प्रवक्ते दिलीप यादव यांनी सुरेल आणि आकर्षक सादरीकरण करत प्रथम क्रमांकाची बाजी मारली. त्यांचे हार्मोनियम वादन इतके मोहक होते की प्रेक्षकांसह परीक्षकांनीही यासाठी विशेष दाद घेतली. त्यांच्या या उत्कृष्ट यशाबद्दलही सर्वत्र कौतुकाची केले जात आहे.
दोन्ही मुख्याध्यापकांनी आपल्या अप्रतिम कलागुणांच्या जोरावर खेड तालुक्याचे नाव उज्ज्वल केले असून शिक्षक समितीकडून या दुहेरी यशाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

