(गुहागर)
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित ‘सार्ध शताब्दी महोत्सवा’ निमित्त गुहागर तालुक्यात देशभक्तीचा उत्सव अनुभवायला मिळाला. ‘वंदे मातरम्’ गीताच्या समूहगायनाने गुहागरात देशभक्तीचा गजर करण्यात आला.
या प्रसंगी गुहागर तालुक्याचे तहसीलदार तथा समिती अध्यक्ष श्री. परिक्षीत पाटील आणि पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत यांनी उपस्थित राहून उपस्थित युवक-युवती व नागरिकांना देशभक्तीचा संदेश दिला. सहस्रावधी तरुण-तरुणींच्या उपस्थितीत सादर करण्यात आलेल्या वंदे मातरम् गीताने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.
प्रमुख वक्ते श्री. अक्षय पवार (गोपाळगड संवर्धन समिती) यांनी बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताचा इतिहास, त्यामागचा उद्देश आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्याचे योगदान यावर प्रकाश टाकला. तसेच, गुहागर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ. योगिता खाडे यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा उल्लेख करून, परदेशात भारताचा झेंडा फडकविताना “वंदे मातरम्” गर्जनेने देशभक्तीचा थरार कसा जाणवतो हे सांगत प्रेक्षकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण केली.
कार्यक्रमात आयटीआयचे शिल्पनिदेशक श्री. प्रदीप घस्ती, श्री. भूपेंद्र पवार आणि प्रशिक्षणार्थ्यांनी सादर केलेली सर्वधर्मसमभावावर आधारित देशभक्तीपर लघुनाटिका विशेष लक्षवेधी ठरली.
यावेळी समिती सदस्य आणि विविध संस्था, शिक्षणसंस्था व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गट विकास अधिकारी कार्यालयाचे श्री. प्रतिक जाधव, गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचे श्री. विलास शेंबेकर, न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पाटपन्हाळे यांच्या मुख्याध्यापिका श्रीमती संपदा चव्हाण, व्यवसाय शिक्षण संस्थेचे श्री. वृणाल बेर्डे, साहित्यिक खरेढेरे भोसले कॉलेजचे श्री. विराज महाजन, उद्योजक श्री. प्रसाद वैद्य, ह.भ.प. गोविंद साळवी बुवा, आयएमसी सदस्य श्री. अमित मोरे, महिला बचत गट प्रमुख सौ. दुर्वा ओक, अपंग पुनर्वसन संस्था, गुहागरचे श्री. उदय रावनंग, ग्रामाधार संस्था, गुहागरचे श्री. अजिंक्य पेडणेकर, तसेच चिखली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मानसी कदम आणि जाणवळे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. जान्हवी विखारे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी, न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पाटपन्हाळे तसेच रिगल टेक्निकल प्रशिक्षण संस्था यांनी मोलाचे सहकार्य दिले.
शाळेचे पर्यवेक्षक प्रा. संजीव मोरे यांनी नियोजन व शिस्तबद्ध व्यवस्थापन केले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गुहागर श्री. प्रितम शेट्ये यांनी केले, तर संपूर्ण आयटीआय स्टाफ – श्री. गुरखे पी.डी., श्री. गोरे ए.एन., श्री. चंद्रशेखर शेंडे, श्री. राजेंद्र मानकर, श्री. विशाल काटकर, श्री. मनोज निजवे, श्री. अनंत चव्हाण, श्री. दीपक जाधव, श्री. इंद्रजीत भोसले, श्री. विठ्ठल मैंद, श्री. शुभम गेडाम, श्री. वकास बरमारे, सौ. शिल्पा भोसले, श्रीमती रोहिणी सुतार, श्रीमती अवंतिका भुवड, श्री. दीपक धनावडे, तसेच भांडारपाल श्री. संदीप नांदगावकर, वरिष्ठ लिपिक श्रीमती ऋतुजा घाग, सहाय्यक कर्मचारी श्री. सतीश बाल्मीकी, श्री. मोहन कांबळे आणि श्री. प्रशांत रेवाळे यांनी परिश्रमपूर्वक नियोजन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय पालकर यांनी केले, तर सौ. समीक्षा धामणस्कर यांनी आभार प्रदर्शन केले.

