(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळ स्थानी रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी प्रमुख पाहुणे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळ स्थानी शिलालेख अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नितेश राणे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री, गणेश गुळे गावचे माजी सरपंच सौ.श्रावणी विक्रांत रांगणकर, प्रमुख वक्त्या सौ. पद्मजा अभ्यंकर सहकार्यवाहिका कोकण प्रांत, सौ मीरा भिडे जिल्हा दक्षिण रत्नागिरी रेणुका प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्षा सौ. दीपा पाटकर, कोकण प्रांत सहकार्यवाहीका सौ.उमा दांडेकर आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थिती लाभली होती.
सदर कार्यक्रम अथर्व कोकोनट रिसॉर्ट गणेशगुळे येथे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेशजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीरा भिडे यांनी केले. तर प्रास्ताविक उमा दांडेकर यांनी केले.
(छाया: दिनेश पेटकर, गावखडी)

