(रत्नागिरी)
जि.प.शाळा पूर्णगड नं.१ ता.जि. रत्नागिरी या शाळेने दुर्गोत्सव या उपक्रमाला जोडून आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत पूर्णगड किल्ला येथे सुरुवातीला रॅली काढून शिवरायांना मानवंदना दिली. तद्नंतर प्रत्येक विद्यार्थ्यांने एक पणती आणली होती तिचे प्रज्वलन करण्यात आले. अशाप्रकारे शाळेमार्फत “दीपोत्सव” साजरा करण्यात आला.
यानंतर शिवरायांच्या कार्याची माहिती, शिवरायांनी गड- किल्ले का स्थापन केले याची माहिती शिक्षकांनी दिली. तसेच गड किल्ले संवर्धनाची गरज याविषयी जागृती केली. शाळेच्या या उपक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शाळेने आयोजित केलेल्या या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे शिक्षण विस्तार अधिकारी बीट पावस हिरवे मॅडम, केंद्रप्रमुख श्री संजय राणे यांनी समाधान कौतुक केले. उपक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका-भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर, विशेष शिक्षिका देवता डोर्लेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

