( रत्नागिरी / प्रतिनिधी )
वंचित बहुजन आघाडीचे २०१९ विधानसभेचे उमेदवार , रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अण्णा जाधव यांना वाढदिवसानिम्मित त्यांच्या मित्र परिवारासह अनेकांनी फोन, सोशल मीडियाद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसापूर्वीच ॲड प्रकाश आंबेडकरांनी अण्णा जाधव यांना दुसऱ्यांदा ‘उत्तर जिल्हाध्यक्ष’ पदाची जबाबदारी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी अण्णा जाधव यांच्यासह एकोणीस जणांची जंबो कार्यकारणी प्रदेश कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली. गेल्या विधानसभेच्या निवडणूकीत अण्णा जाधव यांनी निवडणूक लढवत प्रस्थापितांसह अनेकांचा घाम काढला होता. सध्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष जाधव यांच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते सक्रिय होऊन प्रत्येक समाज घटकातील बांधवांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येतात. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत देखील वंचित बहुजन आघाडी उतरण्याची शक्यता आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी चिपळूण,रामपूर येथील आंबेडकर भवन याठिकाणी सकाळ पासूनच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते येत होते.
दरम्यान नूतन रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष गौतम गमरे यांनी देखील आंबेडकर भवन येथे वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेतली. तसेच दुसऱ्यांना जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या. सकाळी कुटुंबीयातील सदस्यांनी केक कापून अण्णा जाधव यांचा वाढदिवस साजरा केला. दरम्यान वाढदिवसानिमित कार्यकर्त्यांनी संध्याकाळी आंबेडकर भवन येथे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला विविध भागातून जिल्हाध्यक्ष जाधव यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते पुष्पगुच्छ घेऊन आले होते. यावेळी केक कापून त्यांचे कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीने मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला. तसेच या वाढदिवसाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी अण्णा जाधव यांना बुलेट दुचाकी भेट दिली.