(चिपळूण)
चिपळूण तालुक्यातील वहाळ जिल्हा परिषद गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडले असून प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री उदयजी सामंत यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. चिपळूण येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत युवासेना वहाळ विभागप्रमुख दिनेश वहाळकर, पिलवली ग्रामपंचायत सदस्य नितीन पांचाळ, कळंबट युवासैनिक अजित आगरी, कळंबट घवाळगाव युवासैनिक रंजीत गावडे व त्यांचे सहकारी यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला.
यावेळी उपस्थित उपनेते सदानंद चव्हाण, उपनेते संजय कदम, मा. बांधकाम सभापती अण्णा कदम , जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, मा.जि.प. सदस्य बाळशेठ जाधव, मा. जिल्हा नियोजन समिती सदस्य संदीप सावंत , तालुकाप्रमुख रुपेश घाग,अबिटगाव सरपंच सुहास भागडे, बाबुराव घाणेकर, महेश पिलवलकर, महेश काडदरे व शिवसैनिक उपस्थित होते.

