(रत्नागिरी)
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीच्या पुरुष व्हॉलीबॉल संघाने मुंबई विद्यापीठांतर्गत कोंकण विभागीय पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धा २०२५ मध्ये सुवर्ण पदक पटकावत सांघिक विजेतेपद मिळवले आहे. या कामगिरीमुळे महाविद्यालयाने पुन्हा एकदा क्रीडाक्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण झोन क्र. ४ आणि जी.आय.टी. घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय, लवेल (खेड) यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा १६ ते १८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ कौशल्य, संघभावना आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून सुवर्णपदक आपल्या नावे केले.
सुवर्णपदक विजेते खेळाडू
संघातील खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत :
वरुण वारसे, सहील कुवार, आदित्य साळुंके, अथर्व घडशी, हर्ष मोरे, श्रेयस काजरेकर, साहील कुरटे, पार्थ पाटील, दुर्गेश सावंत, राज सावंत, प्रतीक भुवड, सर्वेश बर्गोडे, तन्मय लखान आणि श्री. पाटील.
संघाला क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके, तसेच श्री. गौरांग कुर्टे व श्री. मिनार कुर्टे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल र.ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा सौ. शिल्पा पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे, तसेच सर्व प्राध्यापक, कर्मचारी व सेवकवर्ग यांनी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या पुरुष व्हॉलीबॉल संघाने केवळ सुवर्णपदकच जिंकले नाही, तर शिस्त, जिद्द आणि टीमस्पिरिटचे उत्तम उदाहरण सादर केले. त्यांच्या या विजयामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा क्रीडा लौकिक अधिक वाढला आहे.

