( रत्नागिरी )
लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी आणि सप्तसूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिवाळी पाडवा पहाट – सुरेल गाण्यांचा कार्यक्रम’ हा विशेष उपक्रम आज बुधवार, दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी रत्नागिरी कारागृह परिसरात रंगला. या उपक्रमाचा उद्देश सणासुदीच्या काळात कैद्यांना आनंद, सकारात्मकता आणि सांस्कृतिक अनुभव देणे हा होता.
सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध गायकांनी सादर केलेल्या सुरेल गीतांनी कारागृहातील वातावरण आनंदमय केले. कैद्यांनीही या मैफलीचा मनसोक्त आनंद घेतला. काही कैद्यांनी स्वतः गाणी सादर करून आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले, ज्यामुळे कार्यक्रमात आत्मीयतेची आणि स्नेहाची लहर पसरली.
कार्यक्रमास कारागृह अधीक्षक श्री. संजय पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून अशा सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी मनःपूर्वक आभार मानले.
या वेळी MJF लायन गणेश धुरी, लायन शामल शेठ, अध्यक्ष लायन संजय पटवर्धन, लायन शरद नागवेकर, लायन मनोज सावंत, लायन डॉ. गणेश कुलकर्णी, लायन अस्लम वास्ता, लायन अॅड. महेंद्र मांडवकर, लायन अमेय वीरकर आणि लायन विशाल ढोकले यांची उपस्थिती आणि विशेष सहकार्य लाभले.

