(रत्नागिरी)
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीच्या महिला व्हॉलीबॉल संघाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग महिला व्हॉलीबॉल स्पर्धेत सुवर्ण पदकासह सांघिक विजेतेपद पटकावले आहे.
दि. १६ ते १८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान जी.आय.टी. घरडा इंजिनिअरिंग महाविद्यालय, लवेल (खेड) आणि मुंबई विद्यापीठ कोंकण झोन क्रमांक ४ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि सुवर्ण पदक व कोंकण विभाग क्रमांक ४ चे सांघिक विजेतेपद आपल्या नावे केले.
संघातील विजयी खेळाडू
१) मधुरा राऊत, २) सानिका लिंगायत, ३) प्रसिद्धी सोनावणे, ४) श्वेता खोडे, ५) कृणाली सावंत, ६) श्रेया सारंग, ७) प्रियंका भोंगले, ८) तनिष्का शिरधनकर, ९) स्वरा शिंदे, १०) श्रावणी शिंदे, ११) शृजेश्वरी आवळकर, १२) स्नेहा कदम, १३) समीक्षा धनवे, १४) श्रावणी शेलार.
या संघाला क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके, तसेच श्री. गौरांग कुर्टे आणि श्री. मिनार कुर्टे यांचे कुशल मार्गदर्शन लाभले.
या सुवर्ण यशाबद्दल र.ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पताई पटवर्धन, कार्यवाह श्री सतीश शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे आणि सर्व प्राध्यापक, कर्मचारी, सेवकवर्ग यांनी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

