( मुंबई )
राज्यातील किनारी पर्यटनाला मोठा सन्मान मिळाला आहे. पर्णका बीच (डहाणू, पालघर), श्रीवर्धन बीच (रायगड), नागाव बीच (रायगड), गुहागर बीच (रत्नागिरी) आणि लाडघर बीच (रत्नागिरी) या पाच समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग पायलट’ हा आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. हा दर्जा मिळवणारे हे राज्यातील पहिलेच किनारे ठरले असून, महाराष्ट्राच्या पर्यावरणस्नेही धोरणांना जागतिक पातळीवर मान्यता मिळाल्याचे प्रतीक आहे.
ही माहिती राज्याच्या पर्यटन व पर्यावरण राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी दिली. “समुद्रकिनाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पर्यावरणस्नेही धोरणांतून भविष्याची वाट निश्चित करण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना मिळालेले हे यश प्रेरणादायी आहे,” असे त्या म्हणाल्या.
आंतरराष्ट्रीय ब्लु फ्लॅग पायलट दर्जासाठी महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनाऱ्यांची घोषणा “ब्ल्यू फ्लॅग इंडिया” या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. ‘ब्लू फ्लॅग पायलट’ दर्जा हे किनाऱ्याला मिळालेले ‘उत्तम गुणवत्ता प्रमाणपत्र’ आहे. ज्या किनाऱ्यावर हा ध्वज फडकतो,तो किनारा जगातील सर्वोत्तम आणि सुरक्षित किनाऱ्यांपैकी एक मानला जातो.
आंतरराष्ट्रीय मानांकनाची नोंद
‘ब्ल्यू फ्लॅग इंडिया’ या संस्थेच्या वतीने या किनाऱ्यांची घोषणा करण्यात आली असून, डेन्मार्क येथील ‘फाउंडेशन फॉर एन्व्हायरन्मेंटल एज्युकेशन’ (FEE) या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून हा दर्जा देण्यात येतो. या मानांकनासाठी ३३ विविध निकषांवर मूल्यमापन केले जाते, ज्यामध्ये पर्यावरण शिक्षण, जलगुणवत्ता, सुरक्षा, पर्यावरण व्यवस्थापन आणि सेवा-सुविधांचा समावेश असतो. ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जा म्हणजे किनाऱ्याला मिळालेलं उत्तम गुणवत्ता प्रमाणपत्र आहे. ज्या किनाऱ्यावर हा निळा ध्वज फडकतो, तो किनारा जगातील सर्वोत्तम, स्वच्छ आणि सुरक्षित किनाऱ्यांपैकी एक मानला जातो.
यापूर्वी देशातील १३ समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळाले होते, मात्र त्यामध्ये महाराष्ट्रातील एकाही किनाऱ्याचा समावेश नव्हता. आता श्रीवर्धनसह पाच किनाऱ्यांना ‘ब्ल्यू फ्लॅग पायलट’ दर्जा मिळाल्याने राज्यातील समुद्रकिनारे जागतिक दर्जा मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
पर्यटन आणि रोजगार वाढीस चालना
मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, “हे यश म्हणजे शाश्वत आणि जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देणाऱ्या शासनाच्या कटिबद्धतेची आणि दूरदृष्टीच्या कामाची पावती आहे. भविष्यात आपल्या किनाऱ्यांवर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील, ज्यामुळे पर्यटन वाढेल आणि स्थानिक रोजगारालाही चालना मिळेल. आंतरराष्ट्रीय ब्लु फ्लॅग पायलट दर्जासाठी महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनाऱ्यांची घोषणा “ब्ल्यू फ्लॅग इंडिया” या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. ‘ब्लू फ्लॅग पायलट’ दर्जा हे किनाऱ्याना मिळालेले ‘उत्तम गुणवत्ता प्रमाणपत्र’ आहे. ज्या किनाऱ्यावर हा ध्वज फडकतो,तो किनारा जगातील सर्वोत्तम आणि सुरक्षित किनाऱ्यांपैकी एक मानला जातो”

