(रत्नागिरी)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि कराटे असोसिएशन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा नुकतीच रत्नागिरी येथे पार पडली. ही स्पर्धा दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धा जिल्हा संघटनेचे पदाधिकारी आणि पंच यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कुमिते (फाईट) या प्रकारांत १४ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींची चांगली खेळी पाहायला मिळाली. या स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील खेळाडूंनी १० सुवर्ण, १० रौप्य आणि १० कांस्य अशी एकूण ३० पदके पटकावत जिल्ह्यात तालुक्याचा झेंडा उंचावला.
🔹 १४ वर्षाखालील मुले
२०–२५ कि.ग्रा. : अरहान सोलकर (प्रथम), दुर्वांक बंडेबे (द्वितीय)
२५–३० कि.ग्रा. : स्वर सुवरे (प्रथम)
३०–३५ कि.ग्रा. : स्पर्श लिंगायत (प्रथम), सुजल साळवी (द्वितीय), अंकुर कदम (चतुर्थ)
३५–४० कि.ग्रा. : वेदांत वाघमोडे (द्वितीय), सफल कडगल (तृतीय)
४०–४५ कि.ग्रा. : कार्तिक राठोड (प्रथम), रेहान मजगावकर (चतुर्थ)
५०–५५ कि.ग्रा. : गोपाळ परब (प्रथम), आदित्य नारकर (द्वितीय)
५५–६० कि.ग्रा. : अंशुल शेटे (चतुर्थ)
🔹 १४ वर्षाखालील मुली
३०–३४ कि.ग्रा. : झोया बुडये (द्वितीय), रिद्धी वळवी (तृतीय), स्वरा बापर्डेकर (चतुर्थ)
३४–३८ कि.ग्रा. : मनस्वी कुड (प्रथम), अनुष्का झोरे (द्वितीय), दूर्वा चव्हाण (तृतीय)
३८–४२ कि.ग्रा. : स्वरा बेटकर (चतुर्थ)
५० कि.ग्रा. वरील : फातिमा बुडये (प्रथम), आराध्या चव्हाण (द्वितीय), दूर्वा पवार (तृतीय), वारिजा कांबळी (चतुर्थ)
🔹 १७ वर्षाखालील मुले
रुद्र तिवारी (चतुर्थ)
४०–४५ कि.ग्रा. : अदयान सोलकर (द्वितीय)
५०–५४ कि.ग्रा. : रुद्र खरडे (द्वितीय), प्रथमेश वाघमोडे (चतुर्थ)
५४–५८ कि.ग्रा. : ध्रुव बसणकर (द्वितीय)
🔹 १७ वर्षाखालील मुली
३६–४० कि.ग्रा. : रिया माचकर (प्रथम)
४४–४८ कि.ग्रा. : अध्यासा दास (चतुर्थ)
४८–५२ कि.ग्रा. : आर्या झोरे (प्रथम)
५२–५६ कि.ग्रा. : सलोनी राठोड (प्रथम), मधुरा पारकर (द्वितीय)
🔹 १९ वर्षाखालील मुले
४०–४५ कि.ग्रा. : दिव्य यादव (प्रथम)
६६–७० कि.ग्रा. : आर. इज. मुजावर (प्रथम)
७०–७४ कि.ग्रा. : श्लोक सावंत (प्रथम)
या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून रत्नागिरी तालुक्याचे नाव उज्ज्वल केले. कराटे असोसिएशन रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. जावेद मिरकर, उपाध्यक्ष श्री. दीपक कदम, सचिव श्री. सुरज बने, आणि खजिनदार श्री. अरुण बेग यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील पातळीवरील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

