(नाशिक / प्रतिनिधी)
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामधील पाचशे पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना धीर आणि दिलासा देण्यात आला.
सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने मराठवाड्यात पूरग्रस्त सेवा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गुरुपुत्र श्री मोरे पूरग्रस्त गावांना भेटी देत असून त्यांच्या उपस्थितीत संकटग्रस्तांना मदत वाटप केली जात.
पाचशे कुटुंबियांना मदत वाटप
माजलगाव तालुक्यातील गंगामसला, आळशेवाडी, मांडस चिंचोली, डेपेगाव, मांजरत, पुरुषोत्तम पुरी या सहा गावांमधील पाचशे पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे संच वाटप करण्यात आले. या कार्यात सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या सेवेकर्यांनी योगदान दिले. गुरुपुत्र श्री मोरे यांनी ठिकठिकाणी बाधित शेतकरी आणि नागरिकांना धीर,दिलासा देऊन सेवामार्ग आपल्या सदैव पाठीशी आहे अशी ग्वाही दिली. अजूनही हजारो सेवाकेंद्रांमधून मदत गोळा केली जात असून पूरग्रस्त सेवा अभियान सुरूच राहील असे त्यांनी स्पष्ट केले.

