(रत्नागिरी)
शहरातील थिबा पॅलेसजवळ अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील रस्त्यावर झालेल्या अपघातात दोन तरुण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना मंगळवारी (दि. ७ ऑक्टोबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
जखमींची नावे रत्नदीप रणजित खेतले (वय २४, रा. निवखोल, रत्नागिरी) आणि रुद्र थुळ अशी आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नदीप आणि रुद्र हे दुचाकीने निवखोलहून थिबा पॅलेसमार्गे गगनगिरी मठ–विश्वनगर रस्त्याने जात असताना रत्नदीप यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी थेट रस्त्यावरील इलेक्ट्रीक पोलवर जाऊन आदळली.
या धडकेत रत्नदीप गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला मार लागला आहे, तर मागे बसलेला रुद्र थुळ किरकोळ जखमी झाला आहे. रत्नदीप याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद रुग्णालय पोलिस चौकीत करण्यात आली आहे.

