(राजापूर)
राजापूर नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणापाठोपाठ आज दहा प्रभागातील नगरसवेक पदाच्या वीस जागांसाठी आरक्षण सोडत झाली. या सोडतीमध्ये नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी दोन, नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी तीन, सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सात, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एक आणि सर्वसाधारणसाठी सात जागा आरक्षित झाल्या आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठीची एकमेव जागा प्रभाग-5 (अ)साठी राखीव झाली आहे.
नगर पालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहामध्ये प्रांताधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत झाली. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, मुख्यलिपीक जितेंद्र जाधव यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
आरक्षण सोडतीच्या शुभारंभाच्यावेळी प्रांताधिकारी डॉ. जॅसमिन आणि मुख्याधिकारी श्री. बाबर यांनी आरक्षण सोडतीचे नियम, आरक्षित जागा यासंबंधित सविस्तर माहिती दिली. त्यानंतर, शाळकरी लहान मुलांनी कढलेल्या चिठ्ठीद्वारे आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीनुसार वीसपैकी पन्नास टक्के म्हणजे दहा जागा विविध प्रवर्गानुसार महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.
आज झालेल्या आरक्षम सोडतीमध्ये नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी प्रभाग-2 (अ), प्रभाग-10 (अ), नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)यासाठी प्रभाग-6 (अ), प्रभाग-8 (अ), प्रभाग-9 (अ)
सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी प्रभाग-1 (अ), प्रभाग-2 (ब), प्रभाग-3 (अ), प्रभाग-4 (अ), प्रभाग-5 (ब), प्रभाग-7 (अ), प्रभाग-10 (ब), अनुसूचित जाती प्रवर्गासाठी प्रभाग-5 (अ), सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रभाग-1 (ब), प्रभाग-3 (ब), प्रभाग-4 (ब), प्रभाग-6 (ब),प्रभाग-7 (ब), प्रभाग-8 (ब), प्रभाग-9 (ब) हे प्रभाग आरक्षित झाले आहेत.

