(पाचल / तुषार पाचलकर)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पाचल या अग्रगण्य पतसंस्थेचा ३५ वा वर्धापन दिन सोहळा मंगळवार, १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता कै. गो. बा. नारकर सभागृह, ग्रामसचिवालय, पाचल येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून होईल. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता प्रास्ताविक व अध्यक्ष निवड, सकाळी १०.४५ वाजता महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन, सकाळी ११.०० वाजता मान्यवरांचे स्वागत, तसेच सकाळी ११.३० वाजता डॉ. रविंद्र प्रभुदेसाई यांचा सत्कार समारंभ व सभासदांच्या गुणवान मुलांचा सत्कार पार पडणार आहे. दुपारी १२ वाजता अध्यक्षांचे प्रास्ताविक, दुपारी १२.१५ वाजता मान्यवरांचे मार्गदर्शन आणि दुपारी २ वाजता आभार व समारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून आयु. संतोष पाटील (सहाय्यक निबंधक, राजापूर), आयु. डॉ. रविंद्र वामन प्रभुदेसाई (पितांबरी प्रॉडक्ट्सस चे मालक), आयु. शेखरकुमार अहीरे (मुख्य कार्यकारी अधिकारी, राजापूर अर्बन बँक), आयु. बाबालाल उमर फरास (सरपंच, ग्रामपंचायत पाचल), आयु. आत्माराम सुतार (उपसरपंच, ग्रामपंचायत पाचल), आयु. नी. श्रद्धा सुहास कुलकर्णी (शाखाधिकारी, र.जि.म.स. बँक शाखा, पाचल), आणि आयु. महेंद्र जाधव (पोलीस पाटील) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच आजी-माजी संचालक मंडळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी पतसंस्था मर्या., पाचलचे सर्व आजी माजी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी सर्व सभासद, ग्रामस्थ व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष आयु. चंद्रकांत बाबुराव जाधव, उपाध्यक्ष आयु. प्रकाश विठ्ठल पांगरीकर आणि सचिव कु. साहिल सु. बने यांनी केले आहे.

