( पालघर )
विरार पश्चिमेच्या बोळींज परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 18व्या मजल्यावरून दोन तरुणांनी उडी मारली, अशी घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. शाम घोरई (20) आणि आदित्य रामसिंग (21) या दोघांचा मृतदेह घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात आढळला. आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी किंवा कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही, ज्यामुळे प्रकरण गूढ बनलेले आहे. दोन्ही मृत तरुण नालासोपारा येथील आचोळे परिसरात राहात होते आणि राहुल इंटरनॅशनल महाविद्यालयात पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होते.
स्थानिक कामगारांनी रात्रीच्या वेळेस इमारतीतून जोरदार पडल्याचा आवाज ऐकला. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने अर्नाळा सागरी पोलिस पोहोचले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले की, अपघाताचा किंवा आत्महत्येचा तपास सुरु आहे आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदासाठी पाठविण्यात आले आहेत.
या प्रकरणाबाबत, एका मुलाच्या वडिलांनी ही घटना आत्महत्या नसून हत्या असू आहे असा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी जतीन नावाचा मित्र दोघांना घेऊन फिरायला गेला होता. दुपारी सव्वा तीन वाजेपर्यंत तिघांचे मोबाईल सुरू होते, मात्र रात्री नऊ वाजल्यावर फक्त जतीनचा मोबाईल सुरू झाला. या दृष्टिकोनातून पोलीसांनी सखोल तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
सध्या पोलिस तपास सुरु असून ही हत्या आहे की आत्महत्या, हे अद्याप निश्चित झालेले नाही. तथापि, जर हे आत्महत्येचे प्रकरण असेल तर कोणतीही चिठ्ठी किंवा पुरावा न सापडणे संशयास्पद ठरत आहे. दरम्यान हे प्रकरण अत्यंत संवेदनशील होत असून या प्रकरणी परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

