(रत्नागिरी)
कुडाळ येथे नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ आयोजित कोकण विभाग बॅडमिंटन स्पर्धेत गोगटे जोगळेकर कॉलेजच्या मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले. या कॉलेजच्या सिद्धेश मंगेश फणसेकर याची कोकण विभाग कर्णधार म्हणून निवड झाली आहे.
रत्नागिरी, सिंधुुदुर्ग, रायगड या कोकण विभागतून एकूण १७ संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या सर्व संघातून गोगटे कॉलेज रत्नागिरी चा मुलांचा संघ अव्वल ठरला. या संघात सिद्धेश फणसेकर, अथर्व कवितके, मिहिर वाघाटे, शर्विल संसारे, अथर्व खेडेकर, आदित्य शिर्के, शौनक भावे यांचा समावेश होता.
यातील सिद्धेश मंगेश फणसेकर, अथर्व कवितके, आदित्य शिर्के यांची राज्य स्पर्धेसाठी कोकण विभाग संघात निवड झाली असून विशेष अभिमानाची बाब म्हणजे सिद्धेश फणसेकर याची कोकण विभाग कर्णधार म्हणून सलग तिसऱ्या वर्षी निवड झाली आहे. त्यामुळे तमाम रत्नागिरीकरांकडून सिद्धेश वर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

