(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील संस्थान श्री देव गणपतीपुळे देवस्थान समितीकडून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्यांना मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 21 लाख आणि सेवाभारती पश्चिम महाराष्ट्र या संस्थेला 21 लाखांची मदत चेक द्रारे पाठवण्यात आली आहे.
गणपतीपुळे देवस्थान समितीकडून नेहमीच सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन एखाद्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना उपचारासाठी आर्थिक मदत तसेच सामाजिक काम करणाऱ्या संस्था, संघटनांना त्यांच्या स्तुत्य उपक्रमांसाठी आर्थिक सहकार्य करणे, बौद्धिक क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन सन्मानित करणे अशाप्रकारे सामाजिक स्वरूपाचे काम केले जाते. हेच सामाजिक काम डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात देण्यात यावा या मूळ उद्देशाने गणपतीपुळे देवस्थान समितीकडून मदतीचा धनादेश पाठिवण्यात आला आहे.

