(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे समुद्र किनाऱ्यावर बोट दुरुस्ती आलेल्या रत्नागिरीतील तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी ७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली.
गणपतीपुळे येथे आशिष रमेश लाड वय वर्षे 44 राहणार अरिहंत बिल्डिंग साळवी स्टॉप रत्नागिरी हे गणपतीपुळे येथे समुद्र किनाऱ्यावर असलेल्या एका वॉटर स्पोर्ट व्यवसायिकाच्या बोट दुरुस्ती कामासाठी आले असता ते गणपती मंदिर कमानी जवळ चक्कर येऊन खाली पडले. ही घटना 03. 45 वाजण्याच्या सुमारास घडली असता त्यांना मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तत्काळ गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने दाखल केले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल पणकुटे व डॉक्टर सुनिता पवार यांनी तपासणी केली असता मयत घोषित केले.
त्यांच्या नातेवाईकांशी याबाबत माहिती देऊन त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील व मालगुंड गणपतीपुळे पोलीस चौकी चे पोलीस कर्मचारी करीत आहेत.

