(पुणे)
भारतीय बाजारात अनेक ऑटो कंपन्या ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार दमदार कार ऑफर करत असतात. अशीच एक आघाडीची कंपनी म्हणजे टाटा मोटर्स आहे. कंपनीच्या कार नेहमीच ग्राहकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरल्या आहेत. तसेच बदलत्या वेळेनुसार कंपनीने आपल्या कार अपडेट देखील केल्या आहेत. यासोबतच इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर सुद्धा कंपनी भर देतेय. दरम्यान, ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे टाटा मोटर्स भारतातील दुसरी सर्वात मोठी कार विक्रेता कंपनी बनली आहे.
टाटा मोटर्सने सप्टेंबर 2025 मध्ये वाहन विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सणासुदीचा हंगाम, जीएसटी कपातीमुळे कारांच्या किंमतीत झालेली घट आणि इलेक्ट्रिक वाहनांची वाढती लोकप्रियता या कारणांनी विक्रीत मोठी वाढ झाली आहे.
कंपनीने सप्टेंबरमध्ये एकूण 60,907 प्रवासी वाहने विकली, जे गेल्या वर्षीच्या (2024)सप्टेंबरच्या तुलनेत 47.4 टक्के जास्त आहे (41,313 युनिट्स). भारतात देशांतर्गत विक्री 59,667 युनिट्सची झाली असून, 1,240 युनिट्सची वाहने परदेशात निर्यात केली गेली आहेत, जी मागील वर्षीच्या तुलनेत 396 टक्के जास्त आहे.
इलेक्ट्रिक वाहनांची विक्री (EV) झपाट्याने वाढली
सप्टेंबरमध्ये 9,191 ईव्ही वाहने विकली गेली, जे मागील वर्षी विकलेल्या 4,680 युनिट्सच्या तुलनेत 96.4 टक्के जास्त आहे. जुलै ते सप्टेंबर 2025 या तिमाहीत एकूण 1,44,397 प्रवासी वाहनांची विक्री झाली, जी मागील वर्षीच्या तुलनेत 10.4 टक्के अधिक आहे, तर याच तिमाहीत 24,855 ईव्ही वाहने विकली गेली, जी 58.9 टक्क्यांची वाढ दर्शवते.
व्यावसायिक वाहनांची (CV) विक्री
सप्टेंबरमध्ये टाटा मोटर्सने एकूण 35,862 व्यावसायिक वाहने विकली, जी मागील वर्षाच्या तुलनेत 19 टक्के जास्त आहे (30,032 युनिट्स). एचसीव्ही ट्रकच्या विक्रीत 9,870 युनिट्सची नोंद झाली, आयएलएमसीव्ही ट्रक 6,066 युनिट्स विकले गेले, तर SCV कार्गो व पिकअप वाहनांची विक्री 14,110 युनिट्सवर पोहोचली, जी मागील वर्षीच्या तुलनेत 30 टक्के जास्त आहे. बस आणि व्हॅनच्या विक्रीत कोणताही फरक पडला नाही.
तिमाहीच्या निकालाचा सारांश
आर्थिक वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्सची व्यावसायिक वाहनांची एकूण विक्री 94,681 युनिट्स झाली, जी मागील वर्षाच्या तिमाहीच्या तुलनेत 12 टक्के जास्त आहे. देशांतर्गत विक्रीत 9 टक्के वाढ, तर निर्यातीत 75 टक्के वाढ झाली आहे. यावरून स्पष्ट होते की, बाजारात पारंपरिक पेट्रोल/डिझेल वाहनांबरोबरच इलेक्ट्रिक वाहनांची मागणीही जोरदार वाढत आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अनेकांनी टाटा वाहन खरेदी करत सध्या कंपनीतर्फे सणासुदीच्या दिवसात सुरू असलेल्या अनेक ऑफरचा लाभ घेतला आहे. तसेच एस.पी. ऑटोहब मध्ये आपल्या जुन्या कारचे सर्वोत्तम इ-व्हॅल्युएशनही करता येणार आहे. अधिक माहितीसाठी टाटा मोटर्सच्या एस.पी. ऑटोहब रत्नागिरी, चिपळूण, कणकवली अथवा ओरोस येथील आपल्या नजीकच्या शोरूम ला भेट द्या किंवा 7377959595 या मोबाईल नंबरवर संपर्क करा, असे आवाहन श्री. अरुण देशपांडे यांनी केले आहे.

