(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने १ आणि २ ऑक्टोबर जिल्हा क्रीडा संकुल रत्नागिरी येथे आयोजित जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत अजीजा दाऊद नाईक हायस्कूलच्या १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक तर १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने (३१-१०), १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने (३२-१७) व १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने (४६-२२) अशा गुण फरकानी या संघानी प्रथम क्रमांक मिळवले व हे तीनही संघ सातारा येथे होणा-या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.
खेळाडूंनी उत्तम खेळाचे प्रदर्शन केले.विजयी संघ आणि मार्गदर्शक मैनुद्दिन भैरेवाडी व शाहनवाज राजापकर यांचे आयडीयल एज्युकेशन ॲन्ड वेल्फेअर सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक समीर गडबडे पर्यवेक्षिका रईसा मुजावर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी तीनही संघांचे अभिनंदन करून सातारा येथे होणा-या पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

