(देवरूख / प्रतिनिधी)
साडवली गावातील रहीवासी सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ आनंद तुकाराम डोंगरे यांचे अल्प आजाराने दुःखद निधन झाले. रत्नागिरी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातून सेवानिवृत्त झालेले डोंगरे यांनी देवरूख पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून अनेक वर्षे काम केले.
आपल्या प्रदिर्घ सेवाकाळात त्यांनी तालुक्यात विविध गावात पशुसंवर्धन अधिकारी म्हणून काम करताना शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेत कष्टघेत व मेहनतीने स्वावलंबी बनले पाहिजे या तळमळीने शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारेंपैकी एक होते
दळणवळणाची साधने नसतांना ही वाडीवस्तींवर जात जावून पशुधन वाढीसाठी प्रयत्न करत असत. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलगे. नातवंड असा परिवार आहे. साडवली स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले.