(खेड)
आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने डॉ. अक्षय पवार आणि डॉ. श्रद्धा पवार यांच्या श्रीराम क्लिनिकचे उद्घाटन आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. या नव्या आरोग्य सेवेमुळे चाटव तसेच आसपासच्या गावांतील नागरिकांना तातडीची व दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वरवली गावच्या सरपंच प्राजक्ता यादव, वरवली शाखाप्रमुख दीपक यादव, चाटव येथील प्रतिष्ठित नागरिक हरी गोरे, ग्रामपंचायत सदस्य राम कदम, वरवलीचे माजी सरपंच प्रदीप यादव, ग्रामपंचायत सदस्य संतोष यादव, मिथुन यादव, तुषार आयरे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी पवार दाम्पत्याचे अभिनंदन केले. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या उपक्रमाचे कौतुक करून यामुळे चाटव परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी आवर्जून सांगितले. श्रीराम क्लिनिकमुळे चाटव व परिसरातील नागरिकांना तातडीची तपासणी, उपचार तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळणार आहे.

