(संगमेश्वर / प्रतिनिधी )
पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद, पन्हाळा यांच्या वतीने आयोजित भव्य चित्रकला व शिल्पकला स्पर्धा २०२५ नुकतीच उत्साहात पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातील अनेक नामांकित कलाकारांनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे येथील विद्यार्थी विशाल गोवळकर यांनी आपली उत्कृष्ट कला सादर करत शिल्पकला खुला गट या विभागातून द्वितीय पारितोषिक मिळविण्याचा मान मिळविला आहे.त्याला ११, १११/-रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्याचे सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर -चिपळूण मतदार संघांचे आमदार शेखरजी निकम, संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार माजी प्राचार्य प्रकाश अर्जुन राजेशिर्के, सर्व स्कुल कमिटी सदस्य, कलामहाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव तसेच प्राध्यापकवर्ग यांनी विद्यार्थ्याचे कौतुक व अभिनंदन केले.

