वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह हा नऊ ग्रहांपैकी सर्वात शक्तिशाली मानला जातो. तो प्रेम, आकर्षण, संपत्ती, आनंद आणि समृद्धी या सर्वांचा कारक आहे. शुक्र ग्रह दर २६ दिवसांनी राशी बदलतो, परंतु एका विशिष्ट राशीत पुन्हा प्रवेश करण्यासाठी त्याला सुमारे एक वर्ष लागते. ज्योतिषशास्त्रानुसार, हा योग अत्यंत शुभ मानला जातो आणि यामुळे संबंधित राशींच्या व्यक्तींना आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात मोठे फायदे मिळतात.
जेव्हा शुक्र एका राशीत असतो, तेव्हा तो इतर ग्रहांसोबत युती किंवा दृष्टीकोन निर्माण करतो, ज्यामुळे विशेष योग निर्माण होतात. ऑक्टोबरमध्ये शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे, तसेच युरेनस ग्रहाशी संयोग साधून नवपंचम राजयोग निर्माण होईल. हा योग काही राशींना भाग्य, अनपेक्षित आर्थिक लाभ, आणि नोकरी-संधी देऊ शकतो.
कधी होणार योग?
१४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७:३४ वाजता शुक्र आणि युरेनस एकमेकांपासून १२० अंशांवर असतील, ज्यामुळे नवपंचम राजयोग तयार होईल. युरेनस सध्या वृषभ राशीत स्थित आहे.
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा योग खूप फायदेशीर ठरू शकतो. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील, एकाग्रता वाढेल, आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. या काळात अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ सुरू असलेली आव्हाने संपुष्टात येऊ शकतात. तुमच्या प्रेम जीवनात सुधारणा होईल आणि जोडीदारासोबतचे वाद मिटू शकतात. मुलांकडून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्र-युरेनस योग आनंद आणि संपत्ती वाढवू शकतो. या काळात कपडे, दागिने खरेदी करण्यास शुभ योग आहे. कला, संगीत आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आवड वाढेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि सरकारी व प्रशासकीय कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, तसेच दीर्घकाळापासूनच्या अडथळ्यांवर मात होईल.
मकर राशी
मकर राशीच्या लोकांसाठी हा योग प्रलंबित कामे पूर्ण करण्यास मदत करेल. भाग्यस्थानात शुक्र असल्याने नशीबाची साथ राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. दीर्घकाळ सुरू असलेले प्रयत्न आता यशस्वी होतील. आध्यात्माकडे कल वाढेल, त्यामुळे धार्मिक तीर्थयात्रा करता येतील. कुटुंबातील शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. जितके अधिक परिश्रम कराल, तितके अधिक लाभ मिळेल.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांसाठी हा नवपंचम राजयोग फायदेशीर असणार आहे. या काळामध्ये गुंतवणूक, मालमत्ता खरेदी आणि नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. दरम्यान या काळात कोणतेही नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि धार्मिक विधी केले पाहिजेत. व्यावसायाशी संबंधित असलेल्या लोकांना अपेक्षित लाभ होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना मल्टिनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या ऑफर मिळतील. धार्मिक बाबतीत तुम्ही सहभाग घेऊ शकतात.
(टीपः वरील माहिती वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आणि सामाजिक मान्यतेवर आधारित आहे)

