(मुंबई)
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (MHADA) ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्गमधील घरं व भूखंडांसाठी सुधारित संगणकीय सोडत वेळापत्रक जाहीर केले आहे. म्हाडाच्या या योजनेअंतर्गत ठाणे, पालघरमधील वसई येथील एकूण 5354 सदनिका आणि सिंधुदुर्गमधील ओरोस व कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
सोडतीची तारीख आणि स्थळ
- सोडत दिनांक: 11 ऑक्टोबर 2025
- स्थळ: डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
अर्जदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, पात्र अर्जदारांची निवड संगणकीय पद्धतीने केली जाईल.
महत्त्वाच्या तारखा
- प्रारूप यादी (Draft List) – 01 ऑक्टोबर 2025, सायंकाळी 6.00 वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रकाशित
- दावे आणि हरकती (Claims & Objections) – 03 ऑक्टोबर 2025, सायंकाळी 6.00 वाजता ऑनलाईन नोंदणी
- अंतिम यादी (Final List) – 09 ऑक्टोबर 2025, सायंकाळी 6.00 वाजता संकेतस्थळावर प्रकाशित
सोडत घटकानुसार विभागणी
- 20 टक्के सर्वसमावेशक योजना – 565 सदनिका
- 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना – 3002 सदनिका
- म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (विखुरलेल्या सदनिका) – 1746 सदनिका
- म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (50 टक्के परवडणाऱ्या सदनिका) – 41 सदनिका
- सिंधुदुर्गमधील भूखंड – ओरोस व कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड
अर्जांची आकडेवारी
- एकूण अर्ज: 1,84,994
- अनामत रकमेसह अर्ज: 1,58,424
सोडतीनंतर यशस्वी ठरलेल्या अर्जदारांची नावे व प्रतीक्षा यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली जातील.

