(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी येथे झालेल्या शालेय जिल्हा स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत १७ वर्षे खालील गटात रत्नागिरी तालुक्यातील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालय जाकादेवी येथील हर्ष गणेश सनगरे ५६ किलो वजनी गट प्रथम ,संकेत गणेश धामणे ६० किलो वजनी गट प्रथम, अमन प्रदीप पाचकुडवे ७१ किलो वजनी गट प्रथम, पायल मंगेश वेजरे ४४ किलो वजनी गट प्रथम,श्रावणी सुकेश कांबळे ५८ किलो वजनी गट प्रथम, कार्तिकी प्रवीण देसाई वजनी गट प्रथम,श्रेया सुहास घवाळी ४८ किलो वजनी गट प्रथम क्रमांक संपादन करून गोल्ड मेडलचे मानकरी ठरले. या सर्व स्पर्धकांची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
याच वयोगटातून शिवानी दीपक डावल ५३ किलो वजनी गट द्वितीय, नितीराज मंगेश बोमे ६० किलो वजनी गट द्वितीय क्रमांक पटकावून सिल्व्हर मेडल संपादन केले.विघ्नेश विजय घाणेकर ५६ किलो वजनी गट तृतीय क्रमांक मिळवून ब्रांझ मेडल संपादन केले.
जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत १९ वर्षे खालील गटात बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील धीरज दिलीप मायंगडे ६० किलो वजनी गट प्रथम, तन्मय विजय घाणेकर६५ किलो वजनी गट प्रथम, रोहित चंद्रकांत धामणे ७९ किलो वजनी गट प्रथम, प्रवीणा प्रदीप गावडे ४८ किलो वजनी गट प्रथम तन्वी दीपक धामणे ५३ किलो वजनी गट प्रथम, ऋतुजा राजेश निवेंडकर ६३ किलो वजनी गट प्रथम संपादन करून या विद्यार्थ्यांची कोल्हापूर विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या कनिष्ठ महाविद्यालयातील आदित्य राजू पाचकुडवे ६० किलो वजनी गट द्वितीय,आर्यन सहदेव मोहिते ६५ किलो वजनी गट द्वितीय, रिया महेंद्र माईन ५८ किलो वजनी गट द्वितीय, साहिल जगदीश सावंत ८८ किलो वजनी गट द्वितीय क्रमांक पटकावला. गतवर्षीही या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात प्रशंसनीय कामगिरी करून अनेक स्पर्धकांनी गोल्ड मेडलची कमाई केली होती.
या सर्व यशस्वी स्पर्धकांना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री. संतोष सनगरे, क्रीडा शिक्षक किशोर नलवडे, क्रीडा शिक्षिका सौ. मनिषा धोंगडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या सर्व विजयी स्पर्धकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्यवेक्षक शाम महाकाळ, जाकादेवी विद्यालयाचे सी.ई.ओ. किशोर पाटील, मालगुंड शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विभागीय स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन करून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर झेप घ्यावी, अशा शुभेच्छा चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर आणि जाकादेवी विद्यालयाचे सी.ई.ओ. किशोर पाटील यांनी दिल्या.
छायाचित्र – जाकादेवी येथील वेटलिप्टींग क्रीडाप्रकारात विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत संस्थेचे अध्यक्ष सुनिल उर्फ बंधू मयेकर, सी.ई.ओ. किशोर पाटील, मुख्याध्यापक नितीन मोरे, मार्गदर्शक
(छाया – संतोष पवार, जाकादेवी)

