(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत ‘एक दिवस, एक तास, एका ठिकाणी” या महा श्रमदान मोहीम अंतर्गत श्रमदान मोहीम आयोजित करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत संपूर्ण गणपतीपुळे समुद्र किनारा स्वच्छतेने चकाचक करण्यात आला.
यावेळी स्वच्छता शपथ घेऊन स्वच्छता श्रमदान मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेमध्ये श्रीमती वैदही रानडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी, श्री विजयसिंह जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी, श्री चेतन शेळके गटविकास अधिकारी पंचायत समिती रत्नागिरी, श्रीम.कल्पना पक्ये सरपंच ग्रामपंचायत गणपतीपुळे, श्री सविनय जाधव सल्लागार जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी, श्री प्रवीण चौधरी ग्रामपंचायत अधिकारी, श्री अभिषेक कांबळे समूह समन्वयक पाणी व स्वच्छता विभाग पंचायत समिती रत्नागिरी, गणपतीपुळे ग्रामपंचायतचे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ, देवस्थानातील कर्मचारी, महिला बचतगट, शालेय विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहभाग घेतला,
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री पी. एन सुर्वे विस्तार अधिकारी ग्रामपंचायत, पंचायत समिती रत्नागिरी यांनी केले.

