(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या मार्फत डेरवण येथे अँथॅलेटिक्स क्रीडा स्पर्धां पार पडल्या. या स्पर्धेमध्ये गोगटे जोगळेकर कॉलेज महाविद्यालय रत्नागिरी मधून रानपाट गावची आणि जि.प राणपाट शाळेची माजी विद्यार्थीनी कुमारी तन्वी आनंद मोरे हिने 1000 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला.
तन्वी हिने रानपाट सारख्या दुर्गम भागात शिक्षण घेऊन जि. प. अंतर्गत होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमधून भाग घेऊन वेळोवेळी आपली चमक दाखवली होती. तीच कामगिरी कायम उंचावत तीने आपल्या खेळामध्ये सातत्य राखले आहे. ती एका सामान्य कुटुंबातील असून, घरातील कोणाचेही क्रीडाविषयक मार्गदर्शन किंवा पाठबळ नसताना अशी प्रगतिशील कामगिरी करत आहे.
तन्वी गोगटे जोगळेकर कॉलेज महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना आपल्या उत्तम कामगिरीने गावाचे नाव दिवसेंदिवस उज्ज्वल करत आहे. तिच्या या उज्वल यशाबद्दल तिच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रानपाट सारख्या दुर्गम गावासाठी ही अभिमानाची बाब असल्यामुळे गावातून मोठ्या प्रमाणात तीचे कौतुक केले जाते आहे.