(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे मानेवाडी येथील श्री चंडिका मित्र मंडळाच्या वतीने गणपतीपुळे प्रीमियर लीग नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आज सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीत करण्यात आले आहे. या दिमाखदार स्पर्धेचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायंकाळी साडेसात वाजता गणपतीपुळे मानेवाडी स्टॉप नवी विहीर येथील प्रीमियर लीग मैदानावर होणार आहे. ही स्पर्धा रत्नागिरी तालुक्यातील सर्वात भव्य दिव्य व खास पर्वणी मानली जाते. तसेच आयपीएलच्या धर्तीवर या मैदानाची रचना केली जाते. त्याचबरोबर आयपीएल प्रमाणे या स्पर्धेत खेळाडूंचा लिलाव केला जातो. त्यामुळे ही स्पर्धा पाहण्साठी तालुक्यातील क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
यंदा सहाव्या पर्वातील या स्पर्धेचा थरार क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळणार आहे. या दृष्टीने अत्यंत नेटके नियोजन गणपतीपुळे मानेवाडी येथील श्री चंडिका मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले असून विविध दर्जेदार खेळाडू या जीपीएल मध्ये खेळण्यासाठी दाखल होणार आहेत. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता होणार असून उद्घाटन आणि बक्षीस वितरण समारंभासाठी मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमींनी उपस्थित राहावे असा आवाहन श्री चंडिका मित्र मंडळाचे व स्पर्धेचे प्रमुख संयोजक संकेत उर्फ पिंट्या गावणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.